બુધવાર, 28 ફેબ્રુઆરી, 2018

SSC પરીક્ષાર્થીઓને શુભકામનાઓ

Luck is for the lazy,
*success* is for those who work hard!


All d best for the exams! Perform well! Yes you can do it!! Go for the best, don’t worry for the worst, as god is always there to support!


 *हार्दिक शुभेच्छा!* *फेब्रु/मार्च 2018 दहावी/बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*
*परीक्षा कालावधीत मुलांनी घ्यावयाची खबरदारी*
*परीक्षेचेच्या अगोदरच्या दिवशी*…..
1) पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा.
2) नवीन काही वाचू नका.
3) संकेत शब्द,सूक्ष्म टिपणे,आकृत्या,नकाशे,तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.
4) झोप पूर्ण व सलग घ्या.जागरण टाळा.
5) पहाटे पासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.
6) परीक्षेला लागणाऱ्या आवश्यक साहित्याची जमवाजमव करा.सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा.
7) कपड्यांना इस्त्री व बुटाला पाँलीस करुन ठे
*परीक्षेला निघताना*….
8) परीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र,हाँल तिकीट,पेन(किमान तीन),पेन्सिल,शार्पनर,स्केल,लाँगरिथम,कंपासबाँक्स,खोडरबर,पँड, पाण्याची बाटली,रुमाल,घड्याळ,गरजेनुसार रुपये सोबत ठेवावेत.
9) हलका आहार घ्यावा.(साधी पोळी,भाजी,वरणभात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.
10) रस्त्यातील वाहतूक,ट्रँफिक जँमचा विचार करुन योग्य वेळेत निघा.
11) सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा.मोटर सायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.
12) परीक्षेच्या अर्धा तास सेंटरवर पोहचा.
*परीक्षा हाँलमध्ये*
13) परीक्षा हाँल मध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा.यासाठी…..
14) मन स्थिर ठेवा.जो अभ्यास आपण केलेला आहे,तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो यावर विश्वास ठेवा.
15) मागे काय झाले,पुढे काय होईल याची चिंता न करता शांत बसा.कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करु नका.
*परीक्षा देताना*…..
16) खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करु नका.त्यामुळे Skill Mistakes होतात.हे लक्षात ठेवा.
17) अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका.त्याला सामोरे जा.तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते ईतरानाही अवघड असतात.त्यातल्या त्यात जो धिराने त्या प्रश्नाला सामोरे जातो,उतर लिहण्याचा प्रयत्न करतो तो अधिक गुण मिळवतो.जो त्याचा ताण घेतो तो अधिक चूका करतो.
18) कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन.शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन असा निर्धार सातत्याने करा.
19)चुकूनही काँपी करु नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करु नका.इतर विद्यार्थी काँपी करतात तेव्हा आपल्याला वाटते,की ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात.त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.
*उत्तरप्रत्रिका सोडविताना*…..
20) सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक ,दिनांक,केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.
21) बारकोड चिकटवण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.
22) उत्तरप्रत्रिके मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
23) प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.
25) निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनचा करा.
26)सोपे प्रश्न लक्षात घ्या.प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.
27) विचारले तेच व तेवढेच लिहा.पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो .
28) प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.
29) उत्तराचा आराखडा मनात तयार करा.
30) हिंमत …हौसला बुलंद ठेवा.
31) उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका.परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.
*पेपर झाल्यावर*…
32) पेपर नंतर उतरांबाबत मित्रांसोबत र्चचा टाळा.
33) किती गुण मिळतील यांची बेरीज करीत बसू नका.
34) काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहले आहे,त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.
35) झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.
*पालक व शिक्षकांनी हे जरुर करा*…..
*झालेल्या पेपर वरील चर्चा मुला बरोबर करु नका.*
*मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्याशी संवाद साधून त्या सोडविण्यासाठी मदत करा*
*अभ्यासाला पोषक वातावरण राहील याचा प्रयत्न करा.*
*मुलांच्या प्रगतीबद्द्ल व त्यांच्यातील बद्द्लाबद्द्ल प्रोत्साहन द्या.*
*मुलांना विचार करता येतो,त्यांना त्यांची मतं असतात याचं भान ठेवा.*
*मुलांच्या चांगुलपणावर मनपूर्वक विश्वास ठेवा.*
*पुन्हा-पुन्हा अभ्यासाबाबत त्यांना विचारु नका.*.
*इतरांशी मुलाची तुलना करु नका.*


ટિપ્પણીઓ નથી:

ટિપ્પણી પોસ્ટ કરો

શાસન નિર્ણય

શાસન નિર્ણય

Most Popular